pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्याला यलो अलर्ट

11 व 12 एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11 

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. 11 एप्रिल व दि. 12 एप्रिल, 2025 रोजी यलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी खालीलप्रमाणे दक्षता घेणेचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांनी मेघगर्जनेच्या खेळी, बोजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्यूत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्यूतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या/लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीत-कमी संपर्क ठेवावा. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीजापासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 या क्रमांकावर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा, असे अवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन गणेश महाडिक यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे