pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

हिरकणी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि 19
सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचे कौतुक होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून जालना येथील हिरकणी ग्रुप आणि उज्वल बहुउद्देशील सेवाभावी संस्थेच्या वतीने हिरकणी पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी देखील या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून त्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्‍या पात्र महिलांनी हिरकणी पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष सौ. करुणाताई मोरे आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. रसना देहेडकर यांनी आहे.
महिलांनी केलेल्या कर्तबगारीचे कौतुक व्हावे आणि त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी दर वर्षी हिरकणी पुरस्कारासाठी कर्तबगार महिलांची निवड केली जाते. त्यामुळे विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या आणि समाजासाठी भरीव योगदान देणार्‍या महिला या पुरस्कारातही अर्ज करू शकतात. या पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी फी नाही. किंवा या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. केलेल्या कामाचा प्रस्ताव परिपूर्ण पाठवावा. अर्जानुसार केलेल्या कामाचे मुल्याकंन करून पुरस्कार निवड समिती पात्र महिलेची पुरस्कारासाठी निवड करेल. निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहील. राज्यातील किंवा राज्य बाहेरील कोणत्याही महिलेला या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल. या पुरस्कारासाठी भाषा, जात, प्रांत असा कोणताही भेद नाही. सर्व समाजातील, सर्व भाषेच्या तसेच सर्व प्रांताच्या महिला या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतील. पुरस्काराचे अर्ज हे ऑनलाई पध्दतीने https://forms.gle/cRK8DHvm3LSEhdm99 या लिंकवर फॉर्म भरुन दि. 10 फेब्रुवारी 2025 पर्यत सादर करता येतील. सादर करता येतील. निवड झालेल्या महिलांना कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ कळविण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन सौ. करुणाताई मोरे आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. रसना देहेडकर यांनी केलं आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे