pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.14

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2023-24 चे आयोजन दि. 19 व 20 जुलै 2023 रोजी करण्यात आले आहे. तरी जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी व खेळाडूंनी सहभाग नोंदवावा. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेशिका दि.18 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन www.jalnadso.com या संकेतस्थळावर व प्रत जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धा 62 वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने विविध स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सहभागी होणाऱ्या 14 वर्षाच्याआतील मुले सब ज्युनियर स्पर्धेसाठी 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा. तर 17 वर्षाच्याआतील मुले-मुली ज्युनियर स्पर्धेसाठी 1 जानेवारी 2007 किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा. खेळाडूंकडे जन्म दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट मुळ प्रतीत असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक महमंद शेख व संतोष वाबळे आणि रेखा परदेशी (9022951924) यांच्याशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे