pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दुय्यम निबंधक कार्यालय आजपासून  सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 23

दरवर्षी 1 एप्रिलला बाजार मुल्य दरतक्ते प्रसिध्द होत असल्याने मार्च महिन्यात सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोदंणीसाठी पक्षकारांची गर्दी असते. तसेच अर्थिक वर्ष 2023-2024 या वर्षाचा इष्टांक पुर्ण करण्याच्या दृष्ट्रीने महाराष्ट्र मुद्रांक शुल्कं (अभय योजना) या संबधीचे कामकाज करण्यासाठी व दस्त नोदंणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकांराची गर्दी वाढत आहे, त्यामुळे पक्षकांराच्या सोयीसाठी जालना जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि. 23 मार्च व 24 मार्च तसेच दि.29 मार्च ते 31 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहेत, असे सह जिल्हा निबंधक वर्गं.1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे