pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद  13 डिसेंबर रोजीचे यात्रेचे वेळापत्रक

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि..12

केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दि. 13 डिसेंबर रोजी या गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा – विकसित भारत संकल्प यात्रा बुधवार, दि. 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील कोरेगाव व रोहीना बु. मंठा तालुक्यातील देवठाणा उस्वद व हनवतखेडा, अंबड तालुक्यातील हस्त पोखरी व पारनेर, जालना तालुक्यातील पिंपरीदुकरी व खोडेपुरी, भोकरदन तालुक्यातील सिरजगाव मंडप व निमगाव, जाफ्राबाद तालुक्यातील वीरखेडा भालकी व मरखेडा निरखेडा येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.
या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदिवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागांच्या योजनांचा यात समावेश असणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे