pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

ऐतिहासिक माहितीच्या “बलोच “मराठी चित्रपटास पिरंगुटच्या ‘संस्कार स्कुल ‘मध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

पुणे/ आत्माराम ढेकळे,दि.19

पुणेः- मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील ‘संस्कार प्रायमरी स्कुल ‘च्या विद्यार्थ्यांना मराठ्यांची यशोगाथा मांडणारा “बलोच”हा मराठी चित्रपट येथे प्रथमच दाखविण्यात आला.त्यास विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचे कडुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला .त्यानुसार संपुर्ण महाराष्ट्रातील विद्यालय व महाविद्यालयात हा चित्रपट दाखविण्याचा निर्धार निर्मात्यानी केला .
पाणिपतच्या युध्दात कैद झालेल्या मराठ्यांची यशोगाथा मांडणारा हा चित्रपट असुन त्यामधील दृष्य पाहतांना अंगावर शहारे येत असल्याचे येथील प्रेक्षकांनी अनुभव व्यक्त केले.हा चित्रपट पाहत असतांना विद्यार्थ्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.या चित्रपटातुन अपरिचित इतिहास आवडला असल्याचे प्रामुख्याने कु.वरद संतोष सातपुते,कु.आर्यन विजय थरकुटे आदी विद्यार्थ्यांंनी सांगितले.हा अपरिचित इतिहासाचा चित्रपट सर्व विद्यार्थ्यांंनी माहितीसाठी अवश्य पाहावा.असे आवाहन संस्कार स्कुलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साठे,संचालिका सौ.स्नेहा साठे यांनी केले.प्रामुख्याने हा ऐतिहासिक “बलोच ” चित्रपट पिरंगुट येथील या शाळेत नुकताच प्रथमच दाखविण्यात आला.विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी उत्कृष्ट असे नियोजन शिक्षकवृंद प्रशांत देशमुख ,सुमिना राणा,अश्विनी नलावडे,पल्लवी उंडेगावकर,दिपाली आंबेकर,दिपाली भावसार,सुनिता कोले,सुरेखा शेळके यांनी केले.यावेळी या चित्रपटाचे निर्माते व अभिनेते गणेश शिंदे ,निर्माती सौ.किर्ती वराडकर ,चारुदत्त वराडकर यासोबत कार्यकारी निर्माते संतोष खरात,निर्मिती व्यवस्थापक स्वानंद देव सहाय्यक निर्मिती व्यवस्थापक रोहित ओव्हाळ,सहाय्यक व्यवस्थापक डाॕ.विनील धोत्रे,नयुम पठाण,नितीन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.शैक्षणिक क्षेत्रात माहितीचा व मार्गदर्शक ठरणारा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी व विद्यालय ,महाविद्यालयात दाखविण्यात येणार असुन सदरील चित्रपट हा अल्पदरात पाहता येणार आहे.असे निर्माते गणेश शिंदे व सौ.किर्ती वराडकर यांनी बोलतांना सांगितले.
(चित्रपटाचे आयोजन ,याबाबत माहिती साठी संपर्क करुन शाळेचे नाव,संपर्क क्रमांक आयोजकांनी व्हाट्स क्रमांक ९५११२८७८६० वर पाठविल्यास चित्रपटाचे पुढील नियोजन करता येईल.)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे