संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 31 जानेवरी 2025 पर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि. 23
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत हयात प्रमाणपत्र, बँक पासबुकची छायांकित प्रत (कलर झेरॉक्स संपूर्ण नावाचे अद्यावत तीन नावाचे), उदा. आशा रामराव कसबे याप्रमाणे मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक बँक खात्याला लिंक केल्याची पावती/ ई केवायसी पावती छायांकित प्रत, योजनेबाबत वर्गवारी पुराव्याची छायांकित प्रत अशी सर्व कागदपत्रे संजय गांधी योजना विभाग तहसिल कार्यालय, जालना येथे समक्ष सादर करण्याच्या सुचना दिल्या असून या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक दिल्यावरच सर्वांच्या बॅंक खात्यावर वेळेवर पैसे जमा करण्यात येतील. अशी माहिती तहसिलदार जालना छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


