pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी संयुक्त पुर्व परीक्षेचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.28

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा रविवार दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत जालना येथील विविध 9 परीक्षा उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षेसाठी जालना जिल्हा केंद्रावर एकुण 2 हजार 767 उमेदवारांसाठी एकुण 3 समन्वय पथक, एक भरारी पथक, 9 उपकेंद्र प्रमुख, 38 पर्यवेक्षक, 134 समवेक्षक, 18 सहायक, 9 केअर टेकर व 69 वर्ग-4चे कर्मचारी असे एकुण 281 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मस्तगड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देण्यात आले आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे