जासई विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनिअर कॉलेज दहागाव विभाग, जासई ता.उरण जि. रायगड. या विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हात्रे एम.के.यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक,रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी करून मार्गदर्शन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शक म्हात्रे एम.के. यांनी विद्यार्थ्यांना महापूर,भूकंप, भुस्खलन,आग,आपघात, इत्यादी निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी याचे मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे सहसचिव व दि.बा. पाटील चळवळ स्पर्धेचे प्रमुख संयोजक शैलेश घाग यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.अतुल पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी गुरुकुल प्रमुख ठाकरे एस.पी,प्रा.देवरे ए.एस,प्रा.तोरणे एस.एस, प्रा.गाताडी एस.बी, प्रा.समीर पाटील,प्रा.पाटील एस.व्हीं.व ज्युनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


