pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना; सामनगाव परिसरातील जमीन विक्रीसाठी अर्ज करावेत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 4 

शासनाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या किमान 20 कुटूंबासाठी 2.5 एकर जमीन खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. तरी जालना तालुक्यातील मौजे सामनगाव व परिसरातील जे जमीन मालक त्यांच्या मालकीची अकृषीक जमीन विकण्यास तयार आहेत, अशा व्यक्तींनी जमिनीच्या कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना निवासाची सोय उपलब्ध व्हावी, त्यांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढुन त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी या हेतूने ग्रामीण भागासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना लागु केली आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना या कार्यालयाशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे