pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

परतूर तहसिल आग घटने संदर्भातील चूकीच्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.29

परतूर तहसिल कार्यालय परिसरातील पंचायत समितीची जून्‍या इमारतीमधील हॉल 1 तहसिल कार्यालय परतूर यांच्‍या ताब्‍यात होते. या हॉलमध्‍ये विनावापर व निर्लेखीत करण्‍याकरीता असलेल्या 22 लोखंडी पेट्या, 03 टेबल व इतर रद्दी कागदपत्रे सोमवार, दिनांक 24 मार्च, 2025रोजी रात्री अंदाजे 09:15 वाजेच्‍या सूमारास अचानक लागलेल्‍या आगीमूळे  जळून नष्‍ट झालेले आहेत. या घटनेचा ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी, परतूर यांनी मंगळवार, दि 25 मार्च, 2025 रोजी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पंचनामा आहे. घटनास्थळावर करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये वर नमुद केलेल्या व्‍यतीरिक्‍त हॉल मध्‍ये कोणतेही साहित्‍य अथवा सूरू असलेल्‍या प्रकरणांच्‍या संचीका नष्‍ट झाल्या नसल्‍याची खात्री करण्‍यात आली आहे. ज्यावेळी सदर हॉलला आग लागली होती, त्या आगीवर तात्‍काळ नियंत्रण आणून आटोक्‍यात आणली गेली. तसेच आग लागलेली इमारत बंद असल्‍यामूळे व या इमारतीस विज पुरवठा नसल्‍यामुळे ही आग आकस्‍मात लागलेली नसून, अज्ञात व्‍यक्‍तीने आग लावली असल्याची शक्‍यता आहे. याबाबत पोलीस स्‍टेशन परतूर येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आलेला आहे.

त्यामुळे या आगीत निर्लेखीत साहित्‍य नष्‍ट झाले असून, या व्‍यतिरिक्‍त कोणतेही साहित्‍य नष्‍ट झालेले नाही.  समाजातील काही व्‍यक्‍ती हे विनाकारण या घटनेमध्ये उपयोगी  साहित्‍य  जाळून नष्‍ट झाल्‍याची अफवा पसरवीत आहे. जनतेने अशा निरर्थक आणि चूकीच्या अफवावर विश्‍वास ठेवू नये असे अवाहन तहसिलदार परतूर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे