जालना शहरातील कचेरी रोड येथील SBI एटीएम मशीन तोडुन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या अवघ्या 12 तासात आवळल्या मुसक्या
तीन आरोपी केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जालना/प्रतिनिधी, दि.7
दिनांक (05) रोजी रात्रौ 03.00 वाजेच्या सुमारास गणपती गल्ली जुना जालना येथील SBI बँकेचे एटीएम मशीनचे वायर तोडुन एमटीएम मशीन मधील रोख रक्कम अज्ञात आरोपीतांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे फिर्यादी नामे संतोष सत्यनारायण गारोल, वय-46 वर्ष, व्यवसाय- नौकरी रा.लक्ष्मी कॉलनी, प्रज्ञानगर, शिव मंदीर जवळ, छावणी औरंगाबाद यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब जालना व मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब, जालना यानी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अवघ्या 12 तासात तांत्रिक विश्लेषण, माहितगार यांचे कडुन माहिती संकलित करुन गुन्हा हा अत्यंत शिताफिने उघड करुन गुन्हयातील आरोपी नामे 1) आदित्य आनंद नवगिरे, वय-21 वर्ष, रा. सुवर्णकारनगर, जालना 2) धनंजय अशोक उदावंत, वय-20 वर्ष, रा. गणपती मंदीरच्या पाठीमागे, सुवर्णकार नगर, जालना व 3) राहुल राजकुमार मुख्यदल, वय-23 वर्ष, रा.गणपती मंदीरजवळ, सुवर्णकार नगर, जालना यांना ताब्यात घेऊन त्याकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपीनी गुन्हा करतांना वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, रामप्रसाद पव्हरे, सर्व स्थागुशा, जालना यांनी केली आहे.


