pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अष्टविनायक नागरी पतसंस्थेचा २१ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

२०२४ च्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित २३ जानेवारी २००३ रोजी स्थापन झालेल्या उरण मधील नामांकित अष्टविनायक नागरी पतसंस्थेचा २१ वा वर्धापनदिन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळावर दिनाकं २३ जानेवारी २०२४ संपन्न झाला, या वेळी २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास पथसंस्थेचे उपाध्यक्ष व शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे यांनी सर्वांचे स्वागत करून पतसंस्थेच्या २१ वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा मांडून भविष्यातील पतसंस्थेची पुढील वाटचाल कशी असेल याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले

या वेळी माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, माजी शहर संघटक महेश वर्तक, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, शहर संघटिका मेघा मेस्त्री, संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, उपशहर संघटिका रझिया शेख, माधुरी चव्हाण, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, माजी तालुका संघटिका रंजना तांडेल, अल्पसंख्याक सेलच्या शहर अध्यक्ष मुमताज भाटकर, उपाध्यक्ष सायरा खान, महिला शाखा संघटिका हसीमा सरदार, कविता गाडे, शाखाप्रमुख विकी म्हात्रे, अजय म्हात्रे, सचीन पाटील,दिनेश खेतपाल,गटप्रमुख संदीप चव्हाण, गुरुनाथ रेड्डी, रियाज मुकादम, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री माळी, उपशाखाप्रमुख शाहरूख गडी, फतेह खान ऑडिटर केशव पाटील, पतसंस्थेचे कर्मचारी दर्शना ठाकूर, नीलम भोईर, जगदीश घरत, श्री काठे व पतसंस्थेचे सदस्य उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे