pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

केंद्र शासनाकडून ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 9 

किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2023-24 (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाकडुन दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी पुर्ण न झाल्याने, ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी. या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम व सर्व मंडळाने या प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केल्यावर त्यांनी केंद्र शासनाकडे व्यक्तिश: पाठपुरावा करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ज्वारी खरेदीसाठी दि.30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ मिळवुन दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव योजनेचा लाभ होणार असून शेतकऱ्यांना ज्वारी पिकाचा योग्य मोबदला मिळुन आर्थिक फायदा होईल. असे जिल्हा पणन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे