pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जीवनात गुरुला खूप मोठे महत्व-सुनिताजी चावला

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.15

संत नामदेव महाराजांनी केवळ गुरु केला नव्हता म्हणून त्यांच्यात सर्वत्र अंहकार भराला होता. म्हणूनच गुरुला आपल्या जीवनात गुरुला महत्व आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरला येथील सुनिताजी चावला यांनी येथे बोलतांना केले. त्या पांगारकर लॉन्स येथे जालना व छत्रपती संभाजीनगर येथील बाल संमागममध्ये बोलत होत्या. यावेळी जालना जिल्ह्याचे संयोजक राजकुुमार पारसवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, गेले कित्येक वर्ष संत नामदेवांनी गुरु केला नव्हता.  त्यांच्यात सर्वत्र अंहकार भरलेला होता. तेथून ते निघाले आणि विठ्ठलाला त्यांनी बोलत केलं. त्यावेळी सुध्दा म्हणाले, होय खरेच आहे ते! तुझ्यात सर्वत्र अहंकार भरलेला आहे. हा अंंहकार कशाने जाईल तर तो केवळ गुुुरु केल्याने आणि तेव्हा कुठे संत नामदेवांनी गुरु केला. यावेळी त्यांनी सद्गुरु माता सुदिक्षाजी, गुरु अवतार, गुरु माताजी यांचेही देखील वेगवेगळी उदाहरणे त्यांनी दिले.  एका गावात एक सज्जन जोडपे राहत होते. त्यांचा व्यवहार सुध्दा चांगला होता.परंतू एकवेळ त्वांचे खूप भांडणे लागली. एक सज्जन तेथे आले आणि विचारले तुमचे भांडण कशावरुन आहे, हे लक्षात आले परंतू त्या मुलाला तरी विचारा की, तुला काय व्हायचे! तो सांगेल की, त्याला डॉक्टर व्हायचे की, इंजिनिअर व्हायचे, असे त्या सजन्नाने सांगितल्यावर त्या दोघांचेही यामुळे डोळे उघडले. त्यांचे भांडण मिटले. एक मुलगा रेल्वे जात होता. तो अगोदरच सिटवर बसलेला होता. परंतू तेथे एक व्यक्ती येतो म्हणतो की, मला येथे बसू दे! आता यात त्या मुलाचा काय दोष!! परंतू बरे झाले या ठिकाणी सर्व मुलांची साथसंगत ठेवली आहे.े ते!  कारण अशा बालसंगत नेहमीच ठेवली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी यावेळी विविध उदाहरणे सुध्दा दिली. या बालसमागमचे बहारदार सूत्रसंचालन काजल विश्वकर्माजी, शीतल दत्ताजी, सुबीर रामचन्दानीजी यांनी केले. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे झोनल प्रमुख प.पु. हरीष खुपचंदानी, प.पू. कन्हैलालजी महाराज, छ.संभाजीनगरचे सिडको संयोजक प.पू. डि.जी. दळवी, शालिकरामजी चौरै , जालना जिल्हा संयोजक राजकुमार पारसवाणी, क्षैत्रिय संचालक विजय बोडखे, नारायण भोंबे, कैलास धोडेंकर, राहुल पाटोळे, शिवाजी कुकडे, रघुनाथ काळे, सुधाकर दळवी, बिराजदार, अनिल गुडला नितेश सगंम, मनोज जाधव, अमोल पाटील, अवनिश गरड, आरती डुरे,ज्योती ईगंळे, सुनिल नांदोडे .आदि चि प्रमुख ऊपस्थितीहोती. तर या कार्यक्रमासाठी पैठण, बजाजनगर, मंंठा, परतूर, गोळेगाव, बिडकिन, सिल्लोड, शिवना, भोकरदन आणि पारध तसेच शहरी व ग्रामीण भागातून या बाल समागमास भाविक- भक्तगण मोठ्या संख्खेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन काजल विश्वकर्मा छ.संभाजि नगरचे चि. शितल दंत्त, सुधिर पंजवाणि यांंनी केले. हा बाल समागम यशस्वी करण्यासाठी बाल सेवादल, महिला सेवादल, पुरुष सेवादलाने अथक परीक्षम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे