pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

पेन्शन अदालत व कार्यशाळेचे 19 ऑगस्ट रोजी आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.15 

महालेखापाल, नागपुर व जिल्हा कोषागार कार्यालय, जालना यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता सामाजिक न्यायभवन, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे पेन्शन अदालत व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

सदर पेन्शन अदालत तसेच कार्यशाळेत आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडील निवृत्तीवेतन प्रकरणांविषयी अडचणी जाणुन घेवुन त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ज्या निवृत्तीवेतन धारकांची निवृत्तीवेतन विषयक प्रकरणे प्रलंबित आहेत किंवा वापस करण्यात आली आहेत यांच्याही अडचणी जाणुन घेवुन मार्गदर्शन केले जाणार आहे.

सर्व आहरण व संवितरण अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांची प्रकरणे प्रलंबीत असतील असे निवृत्तीवेतन धारक यांनी सदर कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे