pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आळंदी येथे गोभक्त रघुनाथ संतराम बिडकर यांची पुण्यतिथी सोहळा संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.30

श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे गोभक्त रघुनाथ संतराम बिडकर यांची ५३वी पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक विधीने संपन्न झाला.भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गोपाळकृष्ण मंदिर, आळंदी देवाची येथे श्री गुरुदेव दत्त जयंती च्या पर्वकाळात येथील गोभक्त रघुनाथ संतराम बिडकर यांचा पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता .या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने सरदार बिडकर महाराज यांच्याहस्ते होमहवन,पुजाविधी संपन्न झाले.याप्रसंगी सर्व समाजबांधव सहभागी झाले होते. सर्वांनी भावपुर्ण समाधीचे दर्शन घेतले.याप्रसंगी सरदार बिडकर महाराज प्रबोधन करीत असतांना म्हणाले की,आपल्या जीवनात प्रत्येकांनी पुर्वजांचे श्राध्द,पुण्यस्मरण विधी करावेत.अन्नदान करुन पुण्यकर्म करावे.त्यामुळे पुर्वज संतुष्ट होतात.अशा कार्यक्रमास ज्यांचा सहभाग असतो ते भाग्यशाली असतात. असे व्यक्त केले तर विश्वस्त उमेश बिडकर यांनी सर्वांचे स्वागत केले.याप्रसंगी प्रामुख्याने बिडकर परिवार तसेच शामराव मलठणकर,अनंत डहाळे,विनायक महामुनी,चंद्रकांत खोल्लम,अनिल काजळे,राजेंद्र माने,उद्योजक बाळासाहेब आरु,नारायणराव वाळके,ह.भ.प.रमेशबुवा ,पत्रकार आत्माराम ढेकळे आदी बंधु ,भगिणी उपस्थित होते सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे