pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

डाक विभागात तात्पुरत्या आणि कमिशन तत्वावर ग्रामीण डाक जीवन विमा एजंटसाठी अर्ज करण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.25

छत्रपती संभाजीनगर डाक विभागातील कन्नड, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद आणि सोयगाव या तालुक्यांमध्ये एकुण 50 जागांसाठी ग्रामीण डाक जीवन विमा एजंट नेमणे आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे असणार आहे. याकरीता वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष, शैक्षणिक पात्रता 5 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावातील रहिवासी असल्यास किमान 10 वी पास, 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावातील रहिवासी असल्यास किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेद्वारांनी प्रवर अधीक्षक, डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, जुना बाजार, छत्रपती संभाजीनगर-431 001 यांच्या कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षांकीत प्रत व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह दि. 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत प्रवर अधीक्षक, डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर 431 001 यांच्याकडे सादर करावेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे