pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

कोप्रोली(उरण )ते श्री क्षेत्र कार्ला (लोणावळा )बाईक रॅली उत्साहात संपन्न.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23

मुंबई, नवी मुंबई, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकण किनार पट्टीवर आगरी कोळी कराडी समाजाचे मोठया प्रमाणात वास्तव्य असून या समाजाचे आराध्य दैवत म्हणून लोणावळा तालुक्यातील श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकविरा मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. अडी अडचणीत आई एकविरा भाविक भक्तांच्या पाठीशी सदैव उभी असते अशी भाविक भक्तांची व आगरी कोळी कराडी समाजाची श्रद्धा आहे. त्यामुळे आगरी कोळी कराडी समाजातील व्यक्ति हे नेहमी श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकविरा माता मंदिर येथे जाऊन आई एकविरेचे दर्शन घेऊन नतमस्तक होत असतात. रायगड जिल्ह्यात विशेषत: उरण तालुक्यात आई एकविरेला माननाऱ्यांची, आई एकविरा मातेला पूजणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे आई एकविरा मातेचे महात्म्य लक्षात घेता भक्तांना वर्षातून एकदा तरी वारी करण्याच्या दृष्टीने दरवर्षी पावसाळ्यात बाईक रॅली काढली जाते. कोप्रोली गावातील आई एकविरा मातेचे भक्त देवीचंद म्हात्रे यांनी सण २०२२ मध्ये या रॅलीची सर्वप्रथम सुरवात केली होती. सण २०२२ मध्ये सुरु झालेली ही रॅली आजही अखंडीतपणे तेवढ्याच श्रद्धेने तेवढ्याच जोमाने सुरु आहे. आजपर्यंत या बाईक रॅलीला आई एकविरा मातेच्या कृपेने कोणतेही गालबोट लागले नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, कोणालाही त्रास न देता बाईक रॅली काढली जाते हे या बाईक रॅलीचे खास वैशिष्ट्य आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी कोप्रोली (उरण )ते श्री क्षेत्र कार्ला (लोणावळा )या मार्गावर भव्य दिव्य असे बाईक रॅली काढण्यात आली.कोप्रोली गावचे भक्त देवीचंद म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाविक भक्तांना या रॅलीतून वेगळाच आनंद, समाधान भेटले असल्याचे रॅलीतल्या भाविक भक्तांनी सांगितले. दरवर्षी बाईक रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांची संख्या वाढतच आहे. यंदा बाईक रॅलीचे ४ थे वर्ष आहे.यंदा रविवार २२ जून २०२५ रोजी कोप्रोली गावातून बाईक रॅली निघाली असून सकाळी ६:३० वाजता कोप्रोली(उरण )मधील आई एकविरा मंदिरात आरती, सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मान वंदना देऊन रॅलीला प्रारंभ,कलोते येथे नाष्टा, दुपारी १२ च्या दरम्यान श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकविरा मातेचे दर्शन, दुपारी भोजन, एकविरा मंदिराच्या परिसराची साफसफाई,संध्याकाळी ठीक ४ वाजता परतीचा प्रवास अशा पद्धतीने रॅली संपन्न झाली.

———————————————————-

‘मी एकविरा प्रेमी’ बाईक रॅलीचे ४ थे वर्ष असून कोप्रोली वरुन ४०० एकविरा प्रेमी २०० बाईक घेऊन एकविरेला निघाले.मध्ये नाश्तयासाठी कलोते येथे पेट्रोलपंपवर थांबले.नंतर तिथुन थेट एकविरेला पोहचले.हि बाईक रॅली दरवर्षि एकदम शिस्तबद्ध निघते .या रॅली मध्ये कोणीही दारु पित नाही. एकविरा आईच्या आशीर्वादाने हि बाईक रॅली सुखरुप घरी पोहचली.
– देवीचंद म्हात्रे, कोप्रोली. आयोजक.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे