pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सुभाष पाटील यांचे दुःखद निधन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

उरण नगर परिषदेचे माजी कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाटील यांचे दिनांक १०/११/२०२४ रोजी अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ६६ होते.त्यांचा अंत्यसंस्कार धुळीवाडा उरण येथे करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सुभाष पाटील हे प्रेमळ, मनमिळावू,सर्वांशी समजूतदारपणे वागणारे असल्याने त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुभाष पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ४० वर्षे त्यांनी उरण नगरपरिषद मध्ये सेवा केली.कामगार युनियनचे उपाध्यक्षपदी त्यांनी भूषवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले,६ नातू असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. सुभाष पाटील यांचा दहावा विधी दिनांक १९/११/२०२४ रोजी तर बारावी विधी दिनांक २१/११/२०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी उरण धुळीवाडा येथे होणार आहे. या विधी प्रसंगी कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्विकारले जाणार नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी कळविले आहे. सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व असल्याने सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था,संघटनेचे प्रतिनिधी पदाधिकारी सदस्य यांनी पाटील कुटुंबियांचे सांत्वन करून सुभाष पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे