टीईटी परीक्षा सक्तीला शिक्षक संघटनांचा विरोध. पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी.
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.29
सर्वोच्च न्यायालयाने 01 सप्टेंबरला शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्तीची केल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहे.
या विरोधात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना तसेच राज्यातील सर्व शिक्षक संघटना यांच्यामार्फत 4 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत महा मूक मोर्चा व सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी जालना जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांची सहविचार सभा जालना व बदनापुर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, राज्य शासनाची पुनर्विचार याचिका, तसेच मोर्चाचे नियोजन या विषयांवर चर्चा झाली. यामध्ये सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनुसार सर्व शिक्षक संघटनांच्या राज्य कार्यकारिणीच्या वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री दिलीप जायभाये, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री मधुकर काकडे, आदर्श शिक्षक समितीचे पदाधिकारी श्री लक्ष्मणराव जोशी,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी श्री राजेश मुंगीपैठणकर, तसेच प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष श्री सुभाष भडांगे, श्री गणेश भुतेकर, श्री प्रमोद पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.*
➖➖➖➖➖➖➖➖


