pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

माध्यमिक शिक्षकांचे जालन्यात धरणे आंदोलन

माध्यमिक शिक्षण विभागात कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने शिक्षणाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.8

आज( दि.7) रोज शुक्रवार या दिवशी ‘मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ येथील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले’.

मागील बऱ्याच दिवसापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असणारे प्रश्न संदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तक्रार निवारण बैठक आयोजित करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात कर्मचारी यांचे वैयक्तिक प्रकरणे व सामूहिक प्रकरणे संदर्भात न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु संबंधित शिक्षणाधिकारी यांनी आचारसंहितेचे कारण देऊन वेळकाढूपणा केला आहे. संघटनेमार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे धरणे आंदोलन करून प्रशासनास जागे करीत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले. या वेळी जिल्ह्यातील दोन शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास मराठवाडा शिक्षक संघाने पाठिंबा जाहीर केला. प्रदीप विश्वनाथ राठोड म. स्था. जैन विद्यालय, जालना यांची विनाअनुदानितवरून अनुदानित बदली आदेश मागील सहा महिन्यापासून शिक्षणाधिकारी यांनी प्रलंबित ठेवलेला आहे. परिणामी, वेतनाअभावी संबधित शिक्षकाची उपासमार होत आहे. दुसरे उपोषणार्थी बाळासाहेब देविदास लहाने विनायक विद्यालय, चांदई एक्को (ता.भोकरदन) हे अतिरिक्त झाल्यामुळे त्यांचेही वेतन शाळेने थांबवले आहे. भगवान पालकर यांचा पेन्शन प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला आहे. दत्ता देशमुख यांची सेवाज्येष्ठता सुनावणी दोन वेळेस लांबणीवर जाणीवपूर्वक प्रलंबित आहे. या सर्व प्रकरणासंदर्भात संघटना पातळीवर वारंवार शिक्षणाधिकारी यांना पत्र व्यवहार करण्यात येत असून, संबंधित याबाबत कोणतेही योग्य कार्यवाही करीत नसल्यामुळे तीव्र निदर्शने करण्यात येत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले.

उपोषणकर्त्यांसह जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, सचिव संजय येळवंते, केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, प्रा. मारुती तेगमपुरे, जगनराव वाघमोडे, प्रद्युम्न काकड, हाकीम पटेल, दीपक शेरे, नारायण मुंढे, तुकाराम पडघन, गजानन खरात, रंगनाथ सोन्नी, लंके, अचलखांब, भाबट, नाडे, शिवाजी कायंदे, भगवान पालकर, कुढे सर यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षण विभागात कोणताच अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देताना मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे