pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

तालुका स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत येनोरा जिल्हा परिषद शाळा प्रथम

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

विरेगाव/गणेश शिंदे, दि.3

जालना तालुक्यातील यनोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे
बुधवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन तालुका स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरु करण्यात आली यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.भरत वानखेडे व उपशिक्षणाधिकारी एस निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत हडप सावरगाव बिट, नेर बिट, कार्ला बिट,पिरपिंपळगाव बिट व वाघरूळ बिट , हे पाच बिट सहभागी झाले होते. 1ते 5 या गटात हडप सावरगाव बिट मधील उटवद केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येनोरा हा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला सहभागी विध्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक जितेंद्र कांबळे , मुख्याध्यापक दिपक वनगुजरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी केंद्रप्रमुख अशोक उबाळे, एस बी भालेराव मॅडम, रमेश हुशे, रामहरी माने, शिक्षक वृंद उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे