pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

पिंपरखेड सरपंच पदी लता साखरे यांची निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.8

हदगाव तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत असलेल्या पिंपरखेड येथील ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पद अडीच अडीच वर्षासाठी ठरले होते.पहिल्यांदा निता पिंटु पाटील यांनी सरपंच पद भुषविले होते.ठरल्या प्रमाणे निता पिंटु पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. तालुका प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रकिया करण्यासाठी विस्तार अधिकारी सांवत ग्राम विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुढील कालावधीसाठी लता ञानेश्वर साखरे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थितांनी सरपंच लता ञानेश्वर साखरे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर साखरे, भाजपा तालुका अध्यक्ष तातेराव वाकोडे पाटील , पिंटु पाटील, ओमप्रकाश येवले , शिवसेना महिला तालुका प्रमुख दुर्गाताई भारती, साखरे, वाकोडे, पाईकराव यांच्यासह गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच तंटामुक्त समीती अध्यक्ष पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे