pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उद्योगपती दिपक भास्कर ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त जि.प. शेलघर शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/ विठ्ठल ममताबादे,दि.14

प्रसिद्ध उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक भास्कर ठाकूर, शेलघर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा शेलघर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथ घरत, अतुल भगत, सुधीर घरत, सचिन घरत, प्रकाश भगत, रमेश घरत, अजय भगत,मधुकर पाटील,निशिकांत सुतार,संतोष भगत, कुणाल घरत, डि. पी. सोनावणे, मनमोहन महाराज, श्री. लिंबाजी, राजू ठाकूर, प्रफुल्ल घरत, प्रल्हाद भगत आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्वांनी उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक भास्कर ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देउन त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शाळेचे शिक्षक अशोक पाटील व सर्व शिक्षकांनी सर्वांचे स्वागत केले. आभार प्रदर्शन उपसरपंच सचिन घरत यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता झाली. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे