pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आदर्श इंग्लिश स्कूल जामखेड,येथे आनंदमय वातावरणात आनंदनगरी संपन्न

विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक ज्ञान रुजवण्याचे पालक वर्गातून विशेष कौतुक

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

अंबड/प्रतिनिधी,दि.14

अंबड तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या आदर्श इंग्लिश स्कूल,जामखेड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या आनंददायी सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह,पालक,माता भगिनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आनंद घेतला.
आनंदनागरी सोहळ्यामध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान,चविष्ट व चटकदार खाद्य-पदार्थ बनवून आणले होते. नियोजनबद्ध स्टॉलची मांडणी यावेळी शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होत.,विविध पदार्थांची विक्री-खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.सकाळी मान्यवरांच्या हस्ते आनंद नागरी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करत आनंद नगरीचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष डॉ.गंगाधर पांढरे संस्था सचिव सौ.आशाजी पांढरे, संचालक डॉ.महादेवजी पांढरे, प्रा.आर.आर वैद्य मुख्याध्यापिका सौ.वैशाली खिलाडे यांच्या शुभ हस्ते,सर्व पालक,माता-भगिनीं, सर्व शिक्षक वृंदांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा विद्यार्थ्यांच्या अंगी व्यावहारिक ज्ञान रुजवत, विद्यार्थ्यांनी पैशाची योग्य प्रमाणे प्रत्यक्ष आदान प्रदान परिणामकारक करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमधील व्यवहारिक कौशल्य अत्यंत यशस्वीपणे राबवल्याची उस्फूर्त प्रतिज्ञा यावेळी पालक माता-भगिनी यांनी नमूद केली.
आनंद नगरीच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी उत्कृष्ट नियोजन करत आनंद नगरीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे