pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त  युवा शांती दिवस उत्साहात साजरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.17 

राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त़ नेहरु युवा केंद्र, जालना व केंद्र शासन पुरस्कार प्राप्त़ धरतीधन ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त़ विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताह साजरा केला जात असुन आज युवा शांती दिवस कार्यक्रम जालना येथील महा-बँक स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रात उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक अरुण कासार हे होते तर प्रमुख पाहुणे यशदाचे प्रविण प्रशिक्षक संतोष दाभाडे, आरसेटीच्या प्रशिक्षक श्रीमती अरुणा गायकवाड, धरतीधन  संस्था अध्यक्ष मिलिंद सावंत, जयपाल राठोड यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी श्री. सावंत यांनी नेहरु युवा केंद्र, धरतीधन ग्रामविकास संस्था व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त़ विद्यमाने दि.12 ते 19 जानेवारी 2024 दरम्यान राष्ट्रीय युवा सप्ताह साजरा केला जात असुन आज जालना येथे युवा शांती दिवसा निमित्त़ युवकांना मतदार जागरुकता, स्वयंरोजगर , जलसंधारण व स्वच्छता अभियाना बाबत माहिती दिली जात असल्याचे सांगितले. तर संतोष दाभाडे यांनी युवकांना स्वयंरोजगार उभारणीसाठी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात अरुण कासार यांनी युवकांना शुभेच्छा देऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याविषयी  माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले तर आभार जयपाल राठोड यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती होती. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे