pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत 25 जानेवारीला कार्यशाळेचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 23

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत मातंग समाज व तत्सम जातीतील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वंयरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने राज्य शासनाच्या तसेच राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या विविध योजनाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी जालना येथे दि. 25 जानेवारी 2024  रोजी सकाळी 12 वाजता मातंग समाज बांधवासाठी महामंडळामार्फत रोजगार व स्वंयरोजगार मेळावा, कार्यशाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथे  आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे  जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

जालना जिल्ह्यातील मातंग व तत्सम 12 जातीतील समाज बांधवासाठी महामंडळ, बार्टी व समाजकल्याण विभागा मार्फत विविध योजना राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याकरिता योजनाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी मेळावा/कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. उपस्थित मातंग समाज बांधवांना मार्गदर्शन करण्याकरिता व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे व महाव्यवस्थापक अनिल म्हस्के यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच समाजातील कार्यकर्ते, यशस्वी उद्योजक, महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी, पुरस्कार विजेते मान्यवर व नामांकित व्यक्ती यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी समाज बांधवांनी बहुसंख्येने या मेळाव्यासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथे उपस्थित राहावे, असेही जिल्हा व्यवस्थापक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे