pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना येथे बुधवारी महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.23

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अणि श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग व व्यावस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 24 जानेवारी 2024 रोजी श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महिलांसाठी विशेष पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यासाठी अंदाजे 700 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध होणार आहेत. तरी या मेळाव्याचा जास्तीत जास्त नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत महिला उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहुन व प्रत्यक्ष मुलाखती घेवून महिला उमेदवारांची निवड करणार आहे. यासाठी करिअर मार्गदर्शन तज्ञ समुपदेशकामार्फत करण्यात येणार आहे. तसेच या मेळाव्यात स्वयंरोजगाराबाबत अर्थसहाय्य करणा-या विविध शासकीय महामंडळाचे स्टॉल लावण्यात येणार असुन विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना अंतर्गत विनामुल्य असलेले विविध रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची माहिती देऊन नोंदणी करण्यात येणार आहे.
या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छूक फक्त महिला उमेदवारांनी लाभ घ्यावा. तसेच, महिला उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, इ. कंपनींना देण्यासाठी सोबत ठेवावे. नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी अद्यापर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास WWW.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा यापुर्वी महास्वयंम वेबपोर्टलवर नोदणी केली असल्यास वरील रिक्तपदे व पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करुन लॉगीन करावे आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या सदराखालील जालना जिल्हा निवडून महिला विशेष रोजगार मेळावा यामधील तपशिल पाहावा. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02482-299033 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे