pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

पाणजे गावाच्या नवीन नामफलकाचा अनावरण कार्यक्रम सोहळा झाला मोठ्या उत्साहात संपन्न.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27

आज काल शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली गावंच्या – गावं उध्वस्त केली जात आहेत.आणि हे सर्व पाहता ” माझा गाव माझा अभिमान ” ही संकल्पना उराशी बाळगत आज पर्यंत उरण पनवेल तालुक्यातील अनेक गावांना त्यांच्या गावांच्या नावांचे बोधचिन्ह अर्थात विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नावांचे नवीन नामफलक बनवून देण्याचं औदार्य ज्यांच्या मनाच्या मोठेपणातून साकारलं गेलं असे दानशूर व्यक्तिमत्त्व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्परुपी औदार्यातून आज उरण तालुक्यातील पाणजे गावात पाणजे या नावाचं विद्युत रोषणाईने चमकणारे नूतन नामफलक बनऊन देण्यात आले त्या नूतन नामफळकाच्या अनावरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन पाणजे गावचे सरपंच लखपतजी पाटील आणि ग्रामस्थांच्या वतीने पाणजे गावात करण्यात आले. आज पर्यंत उरण,पनवेल,पेण तालुक्यातील अनेक गावांच्या नावांच्या नामफलकांचे लोकार्पण झाले आहे आणि इतर अनेक गावांच्या नावांचे बोधचिन्ह नामफलक तयार बनवून अनावरण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत आज पर्यंत राजू मुंबईकर यांनी अनेक सामाजिक कार्यांच्या माध्यमातून समाजात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटविला आहे आणि ह्याच सामजिक संस्कारांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या औदार्यातून आज हे सुंदर कार्य साकारलं गेलं ! पाणजे गावचे सरपंच लखपती पाटील यांच्या मागणीच्या विनंतीला मान देतं पाणजे गावांच विद्युत रोषणाईने चमकणारे नामफलक बनवून देण्याचं प्रेरणादायी कार्य साकारण्यात आले.ह्या कार्यक्रमाच्या अनावरण सोहळा कार्यक्रमा प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत अगदी जंगी पद्धतीने ब्रास बँडबाजाच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने करण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना राजू मुंबईकर यांनी म्हटलं की विकासाच्या नावाखाली उध्वस्त होणारी गावं पहिली आणि माझा गावं माझा अभिमान ही संकल्पना मनात आली आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प केला त्यातूनच आज पर्यंत अनेक गावांच्या नावाचे नामफलक ( बोधचिन्ह ) बनऊन देण्यात आले.त्याच बरोबर ह्या कार्यक्रमा करिता खास उपस्थित राहिले ते गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनिल वर्तक यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रकल्पा करिता विस्थापित झालेल्या गावांच्या आणि त्या गावांतील बुजुर्ग आजी – आजोबां ज्यांच्या पिढ्यान् पिढ्या ह्या गावात राहिल्या ज्यांनी आपलं सारं आयुष्य वेचलं त्यांना आपली गावं सोडताना त्यांच्या मनाला झालेल्या वेदना आणि दुःख आपण सर्वांनी पाहिलं आहे त्यांना झालेल्या वेदना आणि त्यांच्या व्यथा यावर बोलताना खूप भावनिक भाष्य करीत वातावरण भावनिक बनवलं!.
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या सौजन्याने साकारलेल्या पाणजे ह्या गावांत नवीन नामफलकाच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी या कार्यक्रमा प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली होती ती महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध निवेदक,समालोचक सुनिल जी वर्तक,गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे अध्यक्ष हिराचंदजी म्हात्रे वेश्वी गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते विनोददादा पाटील आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत, पाणजे गावचे सरपंच लखपती पाटील, माजी सरपंच भालचंद्र पाटील, ग्रा.पं.सदस्य हितेश भोईर करिश्मा पाटील, प्राची पाटील,धनश्री भोईर,प्रभाकर पाटील माजी उप सरपंच रमेश पाटील,ग्राम सेविका समीक्षा ठाकूर आणि सुनिल पाटील,शांताराम पाटील,हेमंत,पाटील,विश्वनाथ पाटील,योगेश पाटील,जगदीश भोईर,विद्याधर भोईर,राजेश भोइर, आशा भोईर,मोनिका भोईर,जयश्री पाटील सोबतच पाणजे गावांतील ग्रामास्थ आणि महिला भगिनिंच्या मोठ्या उपस्थितीत ह्या विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नवीन नामफलकाचा अनावरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे