pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना येथे बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.2

नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग- व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांचे मार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, २ रा मजला, जालना ४३१२०३ येथे दि. ७ फेब्रुवारी, २०२४, बुधवारी सकाळी ११ ते दु.०२ वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले आहे.
भुवन व्हील्स प्रा. लिमिटेड जालना यांची कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सेल्स प्रतिनिधी पदासाठी करिता १० पदे आहेत. तर गौरी अग्रोटेक प्रा. लिमिटेड जालना यांची सेल्स प्रतिनिधी कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी १० पदे, तर स्टोअर सुपरवायझर पदाकरिता कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ०२ पदे, असे एकूण २२ पदाकरीता मागणीपत्र प्राप्त झाले असून नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.
जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in त्याचप्रमाणे www.ncs.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेअर-16 (2023-24) जालना याची निवड करावी.उद्योजक नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. किवा ऑनलाईन सहभाग नोंदवला नसला तरी कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून ०७ फेब्रुवारी, २०२४, बुधवार सकाळी ११ ते दु.०२ प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, २ रा मजला, जालना ४३१२०३ येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा. असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे