pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सोशल मीडियावरील अफवांपासून सावधान मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडून कोणत्याही नवीन योजना सुरु करण्यात आलेल्या नाहीत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.13

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, डिलिव्हरी बॉय, वाहन कर्ज आदिसाठी नवीन योजना सुरु करण्यात आल्याबाबतच्या अफवा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. तरी अशा प्रकारच्या अफवापासून व आर्थिक फसवणुकीपासून सावधान रहावे. तसेच जर कोणी आर्थिक फसवणुक करत असल्यास संबधित व्यक्तीविरुध्द स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करावी जेणेकरुन आपली व इतर नागरिकांची फसवणूक होणार नाही, असे आवाहन मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एकनाथ कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त् निगम यांच्याकडुन कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज, सुक्ष्म पतपुरवठा कर्ज अशा प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात. सद्यस्थितीत शैक्षणिक कर्ज ही एकमेव योजना चालू असून उर्वरीत योजना पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही योजना महामंडळामार्फत सुरु करण्यात आलेल्या नाहीत. परंतू सध्या फेसबुक, व्हॉटसअप, इंन्स्टाग्राम, यांसारख्या प्रसार माध्यमांवर महामंडळामार्फत शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, डिलिव्हरी बॉय, वाहन कर्ज यांसाठी नवीन योजना सुरु करण्यात आल्याबाबतच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. या अफवांद्वारे समाजातील नागरिकांची आर्थिक फसवणुक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे प्रसिध्दीपत्रकांद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे