pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महासंस्कृती महोत्सव जालना 16 फेब्रुवारीला चला हवा येऊ द्याची टीम करणार धमाल मनोरंजन

लोकरंग कार्यक्रमात शाहीर सादर करणार कार्यक्रम जेईएस महाविद्यालयात सायंकाळी 5 वाजेपासून सुरु होणार कार्यक्रम रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सर्वांना प्रवेश विनामुल्य

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.15

महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी जालना लोकरंग व महाराष्ट्रभर प्रसिध्द असलेला कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ यांची टीम कार्यक्रम सादर करणार आहे.
शुक्रवार दि.  16 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5  ते 6:30 या वेळेत जालना लोकरंग या कार्यक्रमातंर्गत आनंद घुले आणि संच, विलास काटे, उषाताई कावळे आणि संच, शाहीर दिलीप पिंपळे आणि संच, शाहीर प्रकाश कातुरे, सुरेश जाधव व संच, शेखर भाकरे व संच आदि स्थानिक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. सायंकाळी  6:30  वा. हास्य रंगांची उधळण: एक सांस्कृतिक ठेवा या कार्यक्रमातंर्गत चला हवा येऊ द्याची टीम  कार्यक्रम सादर करणार आहेत.  निवेदक म्हणून प्रसिध्द अभिनेते सिध्दार्थ झाडबुके हे काम पाहतील. हा कार्यक्रम विनामुल्य असून कोणत्याही पासेसची आवश्कता नाही. तरी या कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे