pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

संपूर्ण तलाठी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार झाल्याने,सध्या नियुक्त्या देण्यात येऊ नयेत – जितेंद्र

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.18

राज्यात गाजत असलेल्या तलाठी भरती प्रक्रियेमध्ये सातत्याने नवनवीन धक्कादायक घटना समोर येत आहेत. तलाठी भरतीच्या निवड यादीत असलेल्या उमेदवारांना अटक करण्यात येत असल्या ने पुराव्यांच्या आधारावर आणि तांत्रिक तपासानंतर संबंधित उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे समोर येत आहे. संपूर्ण तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याने सध्या नियुक्त्या देऊ नये, अशी मागणी समाजिक कार्यकर्ते जितेंद्र गाडेकर यांनी केली आहे.
राज्यातील तलाठी भरती प्रक्रियेत घोटाळा झाला असून त्याबाबतचे अनेक पुरावे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिले आहेत. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात या संदर्भात अनेकांना अटक केली आहे. परीक्षा घेणाऱ्या आयबीपीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांबाबतही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.
या बाबद सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गाडेकर यांनी केली आहे.
एनी डेस्क सारखे सॉफ्टवेअर वापरून हा घोटाळा करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यातील उमेदवारांबाबत पुरावे सापडले आहेत. संपूर्ण तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याने सध्या नियुक्त्या देऊ नयेत, सुरुवातीला न्यायालयीन चौकशी समिती समोर या घोटाळ्याचा तपास करावा, अशी मागणी समाजिक कार्यकर्ते जितेंद्र गाडेकर यांनी एका पत्रकाद्वारे केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे