pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाला प्रतिसाद

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.28

महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक कवी विष्णू  वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी 27 फेब्रुवारी रोजी सर्वत्र मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिश जाधव तसेच कनिष्ठ लिपिक शंकर पवार व विद्यार्थी वाचक व साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असलेली विविध पुस्तके,कथा,कादंबरी, आत्मचरित्र तसेच ऐतिहासिक साहित्य  या ग्रंथप्रदर्शनामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले होते. अशी माहिती  जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय कार्यालय सतिश जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे