pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सोशल मीडियावर ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्याची उरण तालुका ब्राह्मण समाजाची मागणी.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

युट्युब या सोशल मीडियावर एका व्यक्तीने ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द वापरत ब्राह्मण समाजाला संपवून टाकू असे अपशब्द वापरल्या बद्दल उरण तालुका ब्राह्मण समाज तर्फे दिनांक २/३/२०२४ रोजी उरण मध्ये निषेध नोंदविण्यात आला.यु ट्यूब चॅनलवर ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू असे बेताल वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडण्यास कारणीभूत असणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक २/३/२०२४ रोजी उरण ब्राह्मण समाजबांधवांतर्फे उरण पोलीस स्टेशनला तसेच तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ब्राह्मण सभा उरण ट्रस्टीचे विराम उपाध्ये, उपाध्यक्ष अनिल दाते, खजिनदार हेमंत धामणकर, सचिव वैभव राईलकर, कार्यकारिणी सदस्य धनंजय उपाध्ये तसेच महिला मंडळ कार्यकारिणी सदस्य श्रीमती नंदीनी राईलकर, श्रीमती मृणाल उपाध्ये, श्रीमती नेहा उपाध्ये,दर्शना देशमुख तसेच मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे