pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता  शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.11

जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यीक क्षेत्रात कार्य करण्याऱ्या कलावंत साहित्यीक, समाज प्रबोधनकार आणि समाजसेवकांना तसेच सदर समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी वैशाख शुध्द (अक्षयतृतीया) या दिवशी एक व्यक्ती व एक संस्थांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिव पुरस्कार देण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजातील इच्छुक असलेल्या व्यक्ती व त्या समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिव पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव दि. 20 मार्च 2024 रोजीपर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, जालना, भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे