pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भाजपा जालना महानगरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दौड ने साजरी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.31

भारताचे लोहपुरूष माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज दि.३१ ऑक्टोबर रोजी जालना शहरात जालना महानगर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून एकता दौड यात्रा घेऊन साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्याचे माजी अध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे, माजी जालना महानगर जिल्हाध्यक्ष अशोक आण्णा पांगारकर, माजी शहराध्यक्ष राजेश राऊत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कामड, माजी नगरसेवक महावीर ढक्का माजी नगरसेविका सौ.संध्या देठे, सौ.कविता नागवे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर हि एकता दौड यात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते काद्राबाद-पाणीवेस-गरीबशाह बाजार-मस्तगड ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत घेण्यात आली. यावेळी एकता दौड यात्रेमध्ये जालना पोलीस दलातील जवानासह शहरातील तरुण, युवा व जेष्ठ नागरिक, महिला बंधू भगिनीं यांनी सहभाग नोंदवला. यात्रा समारोपानंतर वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले व या नंतर झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

यावेळी सर्वांना राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ देण्यात आली व एक भारत श्रेष्ठ भारत ची घोषणा देण्यात आली. या कार्यक्रमास सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलीये, सुनील खरे, महेश निकम, संजय भगत, देविदास देशमुख, आनंद वाघमारे, अर्जुन गेही, प्रभुदास ठाकूर, जगदीश भरतिया, जिवन सले, कपिल भूरेवाल, संदीप नाईकवाडे, आनंद झारकंडे, उमेश अग्रवाल, राज स्वामी, सुरेंद्र शेडूते, प्रा.राजेंद्र भोसले, डोंगरसिंग साबळे, रवी अग्रवाल, शिवराज जाधव, रोहित भूरेवाल, संजय देठे, कल्याण भदनेकर, राजेश देसार, अजय मिसाळ, गणेश जल्लेवार, राजेश जटावाले, संजय पाखरे, शिवराम सतकर, केदार लाड, रोहित नलावडे, नारायण गोगडे, योगेश सामलेटी, शाम उगले, गणेश पणबिसरे, विशाल उफाड, विवेक पाटील, भुतेकर इत्यादीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे