जाफ्राबाद येथे नगरपंचायत कार्यालयांवर मुलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी धडक मोर्चा
निकृष्ट कामाचं प्रतीकात्मक बॅनर बनवून,नागरिकांच्या मोर्च्याचे केलं सतिश साळवे नी नेतृत्व
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.31
जाफ्राबाद येथील वार्ड क्रमांक पाच मध्ये आनंद बौद्ध विहार असून या ठिकाणी विहाराच्या पाठीमागील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नालीचे पाणी व वाहून आलेली घाण साचली असून त्या ठिकाणी नाल्या पूर्णपणे ब्लॉक झालेल्या आहेत,रोडवर जास्त प्रमाणात माती साचलेली असून त्या ठिकाणी चिखल साचत आहे. व तिथं राहणाऱ्या व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा खूप जास्त त्रास होत आहे.व्यवस्थित लाईट नाहीत,वार्ड क्रमांक ७ व ८ इंदिरानगर मध्ये रोडचे नालीचे काम पूर्णपणे रखडलेले आहे.रमाई नगर,दत्त मंदिर या परिसरामध्ये स्थानिक लोकांना पिण्याचे अस्वच्छ पाणी मिळत असून. या परिसरात कोणत्याही प्रकारच्या नालीची सुविधा नाही व त्यांतच हा परिसर जंगलमय भागांमध्ये असल्यामुळे येथील लोकांना रात्रीला अंधाराचा सामना करावा लागत आहे.
अण्णा नगर,दौलतपुरा परिसरामध्ये दहा घर आहे की,ज्यांना दहा वर्षापासून नळ कनेक्शनची सुविधा उपलब्ध नाही. हे वारंवार नगरपंचायतला निवेदन देऊन सुद्धा यांच्या कडे कोणी लक्ष देत नाही व घरासमोरील नाल्या पूर्णपणे जाम झालेल्या असून त्यामध्ये वार्डात सर्व सांडपाणी साचत आहे.
तसेच इंदिरानगर परिसरातील गुलशन कलेक्शन पासून इमरान खान यांच्या घरापर्यंत मोठा नाला असून त्यामध्ये खूप जास्त घाण साचली असून स्थानिक लोकांना त्याचा खूप जास्त प्रमाणात परिणाम भोगाव लागत आहे. पाशुशाह याच्या घरापासून ते शाहिद शाह यांच्या घरापर्यंत अंडर ग्राउंड नालीची सुविधा उपलब्ध करून द्यावी.असे सांगतं असताना या परिसरात आजी माजी नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट कामांचे प्रतीकात्मक बॅनर बनवून,निकृष्ट काम केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाचं अभिनंदन असे बॅनर लावून निषेध व्यक्त केला.
सोबतच पंतप्रधान आवस योजना मध्ये योग्य लाभार्थ्यांकडून बांधकाम परवान्यासाठी जे ५०० रुपये आकारत आहात ते माफ करा,पंतप्रधान आवास योजना मध्ये जाफ्राबाद शहरातील गोर गरीब लाभार्थी यांच्या कडून घरकुल लाभ घेण्या करीता एकावर्षा चा कर वसूल करणे थांबवा,नगरपंचायतने नाल्याची सफाई करून (ड्रेनेज नालीची) सुविधा करून द्यावी. प्रत्येक ठिकाणी हाई मास्क लाइट लावून अंधार दुर करावा,धडक कामगार युनियन महासंघाच्या माध्यमातून वयाचं कारण दाखवून चालू कामावरून कामगार महिला आणि पुरूषांना कामावरून कमी केलेले आहे त्या कामगारांचे थकीत मानधन देऊन त्यांना किंवा त्यांच्या वारसांना कामावर रुजू करावं,असे नगरपंचायत कार्यालयात समोर बोलत सांगून आमच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सतिश साळवे यांनी नगरपंचायत प्रशासन तथा अध्यक्ष यांना देण्यात आला.


