pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या लिलावास प्रारंभ

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.10

मराठी नवं वर्ष तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लासुर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट यार्डामध्ये तूर, गहू, ज्वारी, बाजरी, हरबरा, मका सोयाबीन, अशा नवीन रब्बी पीक हंगामातील लिलावास आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते बोली लिलाव पद्धतीने बोली बोलून मंगळवारी (दि.०९) शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान आमदार बंब यांनी व्यापाऱ्यांच्या अडत दुकानांना भेटी देऊन त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच बाहेर गावावरून आपला शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यास येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
शेषरावनाना जाधव, उपसभापती अनिल चव्हाण, सचिव कचरू रणयेवले, उपसरपंच संपत छाजेड, युवा व्यापारी प्रितम मुथा, बाजार समितीचे संचालक, सुरेश जाधव, संतोष जाधव, मनीष पोळ, अशोक जगताप, सुनील पाखरे, शैलेश मुथा, विनोद ठोळे, बाजार समितीचे माजी संचालक महेंद्र पांडे, आंबदास गायके, भाजप तालुका अध्यक्ष रवी चव्हाण, युवा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव, संतोष काळे, बाळू शर्मा, ग्राम पंचायत सदस्य, भाजप
कार्यकर्ते, आदीसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे