pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उमेद अभियानातुन महिलांनी उद्योगजक बनावे सिईओ मिनल करनवाल

पळसा येथे रेणुका पापड उद्योगास भेट

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.12

पळसा ता.हदगांव येथील रेणुका महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविता निमडगे यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून स्टेट बँक स्वयरोजगार प्रशिक्षण संस्था नांदेड ( आरटीसी )अंतर्गत प्रशिक्षण घेऊन रेणुका महिला बचत गटा अंतर्गत कर्ज घेत शिलाई मशीन पिठाची गिरणी कापड उद्योग सुरु करत आपल्या घरी रेणुका पापड उद्योग सुरु केला. त्यांनी उभारलेल्या पापड उद्योगातुन चांगली कमाई करत उमेद अभियानातुन सक्षम झाल्या असल्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांनी शुक्रवार बारा एप्रील रोजी हदगांव दो-यावर असताना उमरी तामसा हदगांव पंचायत समिती सह पळसा येथे सविता निमडगे यांनी आपल्या घरी उभारलेल्या पापड उद्योगास भेट दिली.
यावेळी सविता निमडगे यांनी रेणुका महिला बचत गटाच्या वतीने सिईओ मिनल करनवाल मॅडम यांना पापड पैकिंग भेट देऊन शाल श्रीफल देऊन सन्मान केला. यावेळी त्यांनी उमेद अभियानातुन सुरु केलेले पापड उद्योगासह पिठाची गिरणी शिलाई मशीन विषयी माहीती घेत उभारलेल्या उद्योगाविषयी चर्चा करीत आवश्यक मार्गदर्शन केले.उभारलेल्या उद्योगाचे कौतुक करत महिलांनी सविता निमडगे यांनी उमेद अभियानातुन सुरु केलेल्या उद्योगाचा आदर्श ईतर महिलांनी घ्यावा असे आवाहन केले. त्यांनी उमेद अभियानातुन महिलनी उद्योगजक बनावे असे आवाहन केले.
यावेळी उमेद जिल्हा व्यवस्थापक गजानन पातेवार , गटविकास अधिकारी कैलास बळवंत बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे ,विस्तार अधिकारी रणजित लोखंडे ,ग्रामविकास अधिकारी कुणाल मांजरमकर ,जिल्हा कौशल्य गायकवाड गणेश कवडेवार , प्रभाग समन्वयक अमोल नवघरे , जिवनाकुंर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र चिल्लोरे , जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षीका अंगणवाडी सेविका सोनटक्के , मदतनीस वर्षा खाडे , बालाजीराव चेपुरवार पत्रकार प्रभाकर दहिभाते यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे