pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्रीरामनवमी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कैलास जाधव

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.15

शहरात अनेक वर्षापासून रामनवमीचे देखावे व सांस्कृतिक उपक्रम साकार करणार्‍या स्वराज्य रक्षक संघ आयोजित श्रीराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी शहरातील समाजसेवक कैलास विठ्ठल जाधव यांची तर उपाध्यक्षपदी डॉ.सजय तेली यांची निवड करण्यात आली.

शहरात समितीने आयोजित केलेल्या बैठक सभेत ही निवड करण्यात आली. बुधवारी (दि.१७) एप्रिल रोजी होत असलेल्या श्रीराम नवमीत या समितीच्या वतीने शहरातून मिरवणूक काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यावर्षीच्या श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास जाधव बोलताना म्हणाले की, यावर्षी नव्या उत्साहात, आनंदात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच श्रीरामजन्मोत्सव समितीची बैठकीत उर्वतीत कार्यकारणी निवड करण्यात आली. त्यामध्ये संघटन प्रमुख, संस्थापक नितीन राठोड, संघ सचिव श्रीकृष्ण बडग, संघटन कार्यवाह अमोल तागवले, प्रमोद ढोले, हेमंत गर्गे, राजेंद्र गव्हाणे दीपक डोळस, अरुण मासरे, बंटी इंगळे, उमेश सातदिवे, आदित्य पाटील, जयेश देशमुख, विश्वजीत केवट, निशांत चव्हाण, इमरान शेख, संजय चव्हाण, कुणाल शिरसाट, विजय बोरसे, योगीराज साबळे, अनिल सिरसाट यांचा समावेश आहे. यावेळी बैठकीस उपस्थितांनी व मित्रपरिवारांनी अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणी सदस्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे