pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

विधी स्वयंसेवक नेमणूकीसाठी अर्ज करावेत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व त्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या  तालुका विधी सेवा समिती अंबड, परतूर, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी येथे विधी स्वयंसेवकांची नेमणूक करणे आहे. विधी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन  सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 विधी स्वयंसेवक पदासाठी उमेदवार हा निवृत्त शिक्षक, एम.एस.डब्ल्यू विद्यार्थी व शिक्षक,  अंगणवाडी सेविका, विद्यार्थी / कायद्याचे विद्यार्थी (जोपर्यंत ते वकील म्हणून नावनोंदणी करीत नाहीत तोपर्यंत),  बिगर राजकीय सेवाकेंद्रित, बिगर शासकीय स्वयंसेवी संस्था व क्लबचे सदस्य, महिला गट/मैत्री संघ आणि दुर्लक्षित / दुबळ्या गटांसहित इतर स्वयंसहायता गटातील सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीला विधी स्वयंसेवक म्हणून योग्य वाटेल अशी कोणतीही व्यक्ती अशा गटापैकी पात्र व्यक्ती, विद्यार्थी, महिलांनी आपला अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व तालुका स्तरावरील तालुका विधी सेवा समिती येथे कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून दि.30 एप्रिल 2024 रोजी पर्यंत देण्यात यावा.

कार्यालयाचा संपर्क पत्ता – जिल्हा न्यायालय परिसर, अंबड चौफुली, जालना  फोन नं.: ०२४८२-२२३६२५ मो.नं. ८५९१९०३६२, तालुका स्तरावरील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालय, अंबड, परतूर, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापुर, मंठा व घनसावंगी असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे