[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.19
अंबड : परभणी लोकसभेची निवडणूक जनतेनी हातात घेतली आहे. त्यामुळे परभणी मतदार संघात येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रात महायुतीला लीड मिळणार असून निवडणुकीत लाखोच्या फरकाने माझा विजय होणार. असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. परभणी महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ घनसावंगी विधानसभेचे निवडणूक प्रमुख सतीश घाटगे यांच्यावतीने वडीगोद्री येथे संत तुकडोजी महाराज आश्रम परिसरात गुरुवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेस जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या सभेस भाजपा नेते सतीश घाटगे, शिवसेनेचे पंडितराव भुतेकर, राष्ट्रवादीचे रवींद्र तौर, सुनील आर्दड रामेश्वर भांदरगे, शिवाजीराव बोबडे, शालिनी बुंदे, अर्चना सोसे, डॉ. रमेश तारगे, पंडूनाना खटके, विजय खटके, अरुण घुगे, अशोकराव लांडे, डॉ. केदार खटीग यांच्यासह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित होते.लाखोच्या फरकाने लढाई जिंकणार- महादेव जानकर
परभणी लोकसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व पक्षाची ताकत माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. घनसावंगी विधानसभेत सतीश घाटगे यांनी कोणत्याही पदावर नसताना केलेल्या विकासकामामुळे या विधानसभेतून विरोधकांपेक्षा सर्वाधिक मते मला मिळणार आहे. अशीच स्थिती उर्वरित पाच विधानसभा क्षेत्रात आहे. त्यामुळे लाखोंच्या फरकाने ही लढाई आम्ही जिंकू असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. तसेच घनसावंगी मतदार संघातील सिंचन प्रकल्प, पायाभूत सुविधा युवकांचा रोजगाराचा प्रश्न सरकार आणि खाजगी संस्थाच्या सहकार्यातून सोडविण्याचे आश्वासन त्यांनी या सभेतून दिले.सिंचनाचा सर्वात मोठा प्रश्न मार्गी लागणार – सतीश घाटगे
दोन वेळा जनतेने ज्या खासदाराला निवडून दिले. त्या व्यक्तीने फक्त आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली. महादेव जानकर साहेब यांचं संपूर्ण आयुष्य जनतेला समर्पित आहे. ते जनतेसाठीच काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून घनसावंगी विधानसभेतील सिंचनाचा सर्वात मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच इतर पायाभूत सुविधांचा त्यांच्या माध्यमातून कायापालट होईल ,यात शंका नाही. म्हणून या लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडवण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महादेव जानकर यांना शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे या सभेतून सतीश घाटगे यांनी केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]