pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघ; निवडणूक खर्च निरीक्षकांनी केली उमेदवारांच्या व्दितीय वेळीच्या लेख्यांची तपासणी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.7

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 18-जालना लोकसभा मतदारसंघाकरीता खर्च तपासणीसाठी निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून सर्वना कुमार के. (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणुक आयोगाने केलेली आहे. उमेदवाराच्या प्रचाराच्या कालावधीत किमान तीन वेळा ते प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करणार आहेत. आज मंगळवार, दि. 7 मे 2024 रोजी त्यांनी जालना लोकसभेसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या व्दितीय वेळेच्या लेख्यांची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयात केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा  खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी राजू सोळूंके, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पंजाब पुंडगे आदींसह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उमेदवाराने खर्च निरीक्षक यांना व्यक्तीशः किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे. निवडणुक प्रक्रियेमधील प्रत्येक तपासणीनंतर उमेदवाराच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीच्या तारखेपर्यंत स्कॅन करण्यात येऊन निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाईल. निवडणूक खर्च तपासणीसाठी तिसरी तपासणी दि. 11 मे 2024 रोजी केली जाईल. तरी सर्व लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 18 जालना लोकसभा मतदार संघात दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 77 (1) हे लोकसभेच्या किंवा राज्य विधानसभेच्या प्रत्येक उमेदवारांस ज्या तारखेस तो नामनिर्देशित झाला होता ती तारीख व निवडणुकीच्या निकाल घोषित झाल्याची तारीख या दोन्ही तारखांसह या दरम्यान त्यांनी केलेल्या किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेल्या खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा (हिशेब) ठेवणे अनिवार्य आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे