pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघ  कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्याचे जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापकांचे निर्देश  

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.9

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 करिता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत उद्योग, उर्जा कामगार व खनिकर्म विभागाने दि.22 मार्च 2024  रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. तरी लोकसभा निवडणुक असलेल्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोमवार दि. 13 मे 2024 रोजी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक वाय.आर.सारणीकर यांनी  उद्योग विभांतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समुह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी दिले आहेत.

मतदानासाठी सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समुह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक आहे.

तरी उद्योग विभांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समुह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडुन मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे