जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ना. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ शेवटच्या दिवशी संत नगरी पैठण जय श्री रामाच्या घोषणांनी दणाणून गेली . खासदार नवनीत राणा यांच्या दणदणीत व जल्लोषात झालेल्या प्रचार रॅलीमुळे संपूर्ण वातावरण भाजपमय झाले.
पैठण शहरात शनिवारी ( ता. 11) सकाळी 11.00 वाजता महायुतीचे उमेदवार ना. दानवे यांच्या प्रचारार्थ खंडोबा मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली.यावेळी ना. रावसाहेब दानवे,शिवसेना उपनेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, नगराध्यक्ष सुरज लोळगे ,आप्पासाहेब निर्मळ , कल्याण नाना गायकवाड ,डॉ . सुनील शिंदे ,रेखाताई कुलकर्णी , अश्विनी लखमले ,नम्रता पटेल,शेखर पाटील ,तुषार पाटील ,अतीश बारे, पंडितराव भुतेकर ,सोमनाथ परदेशी, आप्पासाहेब निर्मळ, लक्ष्मण औटे ,रेखा कुलकर्णी ,सुरज लोळगे, कल्याण गायकवाड ,तुषार सिसोदे, महादेव बटुळे, अश्विनी लखमले ,आशिष मापारी, यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
रॅली चे ठिक- ठिकाणी पैठण वासियांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातच रॅलीचे सभेत रूपांतर झाले .
यावेळी बोलताना खा. नवनीत राणा म्हणाल्या , ही निवडणूक देशाची असून मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची गरज आहे . काँग्रेसच्या राहुल गांधींना पाकिस्तानातून प्रेम पत्र येत आहे . पाकिस्तानवर प्रेम करणाऱ्याराहुल गांधीला मतदान म्हणजे पाकिस्तानला मतदान असे सांगून नवनीत राणा यांनी एमआयएम च्या ओवेसींवर शाब्दिक हल्ला चढवला. काँग्रेसने शेतकऱ्यांचे हाल केले याची आठवण त्यांनी करून दिली.
काँग्रेस सह एमआयएम ची मिली भगत आहे .हैदराबादला माझ्यावर गुन्हा दाखल केला मी गुन्ह्याला घाबरत नाही ओवेसींचाही चांगला समाचार यावेळी नवनीत राणा यांनी घेतला.तथापि कमळ निशाणी समोर मतदान करून ना. रावसाहेब पाटील दानवे यांना विजयी करा असे आवाहन खा. नवनीत राणा यांनी केले त्यांच्या भाषणाने तरूणाईमध्ये जल्लोष निर्माण झाला.रॅलीत महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी, महिला, तरुण, व्यापारी, शेतकरी बांधवांनी मोठी गर्दी केली.यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
——————————————–
ना. दानवे यांच वादळ घोंगावतय : माजी मंत्री खोतकर
सुरक्षा आणि स्थिरतेसाठी भाजपला साथ द्या : ना. दानवेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात स्थिर सरकार राहिल्यामुळे संपूर्ण भारत देशात विकासाचे मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत. देशाच्या सीमाही सुरक्षित असून महायुतीकडे मोदींच्या रूपाने पंतप्रधान पदाचा सक्षम चेहरा आहे. या उलट नेता आणि निती नसलेले विरोधक गोंधळलेल्या अवस्थेत असून जनतेने स्थिर सरकार देण्यासाठी भाजपला साथ द्यावी असे आवाहन केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी याप्रसंगी बोलताना केले.
__________
श्री श्री रविशंकर जी यांच्या शुभेच्छा!आर्ट ऑफ लिव्हिंग या विश्वव्यापी सेवाभावी परिवाराचे संस्थापक, पद्मविभूषण श्री. श्री .रविशंकर जी यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना. रावसाहेब पाटील दानवे यांना दुरध्वनी द्वारे शुभेच्छा व आशीर्वाद दिले. समाजातील सर्व स्तरातील मानसिक, शारीरिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे जीवनमान उंच व्हावे यासाठी कार्यरत असलेल्या आर्ट ऑफ लिविंग सारखे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी मार्फत अंत्योदय, दुर्लक्षित, वंचित शेवटच्या व्यक्तीचा शाश्वत विकास ध्येय ठेवून कार्यरत आहेत या अनुषंगाने श्री श्री रविशंकर जी यांनी ना. दानवे यांना शुभेच्छा दिल्या. श्री श्री.रवी शंकर जी यांना जालना येथे निमंत्रण दिल्याचे ना. दानवे यांनी सांगितले.
__________
भावसार समाज मंडळाचा पाठिंबा!
जालन लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री, ना. रावसाहेब पाटील दानवे यांना पैठण तालुका भावसार समाज मंडळाच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. प्रचंड मतांनी आपण विजयी व्हाल असा विश्वास भावसार समाज मंडळाने ना. दानवे यांना दिलेल्या पाठिंबा पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
_________



