सत्यशोधक विद्यालयाच्या खेळाडूंचे गोळाफेक मध्ये यश
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.17
मानव विकास व पूर्णनिर्माण संशोधन संस्था छत्रपती संभाजीनगर संचालित सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यात गोळा फेक तसेच धावण्यामध्ये यश संपादन केले आहे यामध्ये आरती लक्ष्मण दाभाडे वयोगट 17 गोळा फेक प्रथम क्रमांकाने विजयी व जिल्हा स्तरासाठी निवड तसेच राजश्री रामेश्वर श्रीखंडे 19 वयोगट 3000 मीटर धावणे द्वितीय क्रमांकाणे विजयी व जिल्हा स्तरासाठी निवड व 200 मीटर धावणे तृतीय क्रमांकाने विजयी झाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुनील वाकेकर व संस्थेच्या सचिव जयश्री बनकर यांच्यासह सर्व शिक्षक यांनी पुढील वाटचालीसाठी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक गोविंद शिंदे, नंदकिशोर मापारी, रामेश्वर खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.


