“अवुल पाकीर जैनुलाब्दिन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम
जालना, दि.17
(१५ ऑक्टोबर १९३१ – २७ जुलै २०१५) हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. अशा प्रकारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९८मध्ये भारताच्या पोखरण-II अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली. १९७४मध्ये भारताने केलेल्या मूळ अणुचाचणीनंतर ही पहिलीच चाचणी होती.अब्दुल कलाम यांना ‘मिसाइल मॅन’ नावानं प्रसिद्ध असलेल्या एपीजे अब्दुल कलाम यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापूर्वी केवळ 1952 मध्ये सी. व्ही. रमण वगळता इतर कोणत्याही शास्त्रज्ञाला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं नव्हतं.
1 मार्च, 1998 रोजी राष्ट्रपती भवनात भारतरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात कलाम काहीसे नर्व्हस होते. त्यामुळं ते त्यांच्या निळ्या टायला पुन्हा-पुन्हा हात लावत होते.
कलाम यांना अशा कार्यक्रमांची चीड यायची. कारण ज्या कपड्यांमध्ये त्यांना अवघडल्यासारखं वाटायचं तेच कपडे त्यांना अशा कार्यक्रमांत परिधान करावे लागायचे. सूट परिधान करणं त्यांना कधीच आवडलं नाही. एवढंच काय पण लेदर शूजऐवजी नेहमी स्पोर्ट्स शू परिधान करणंच त्यांना आवडायचं.””कलामांनी लिहिलेली पुस्तके-
अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नायटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
‘इंडिया 2020- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत 2020: नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया – माय-ड्रीम
उन्नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन :
फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
टार्गेट 3 मिलियन (सहलेखक – सृजनपालसिंग)
ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक – अरुण तिवारी)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक – व्ही. पोतराज, मराठी अनुवाद – अशोक पाध्ये)
ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
बियॉंण्ड 2010 : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)
महानतेच्या दिशेने : एकत्र येऊ या बदल घडवू या (मॅजेस्टिक प्रकाशन)
स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे सदर पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.
संग्रहक व वाचक
चित्रकार संतोष औटी


