pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.10

दि.29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथील मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष लोकअदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. तरी जालना जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावी अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येवू शकतील. लोकअदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पध्दतीने सहभाग घेवू शकतात. साध्या सोप्या पध्दतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होवू शकणार असतो. वेळेची व पैश्याची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते. अशी विशेष लोकअदालतीचे फायदे आहेत. असे सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे